खोपोली – ( प्रतिनिधी )
खोपोलीत आज सकाळी भीषण अपघात झाला. खोपोली एक्सिट नंतर शीळ गावाच्या हद्दीत एक विद्यार्थी व शिक्षक यांची सहलीची बस रास्तावरून उतरली व एक खडकाला धडकली.
दुर्दैवाने यात बस चा क्लिनर याचा मृत्यू झाला पण सुदैवाची गोस्ट म्हणजे बस मध्ये प्रवास करणारे ४५ विद्यार्थी व शिक्षक बाल बाल बचावले. काही विद्यार्थ्याना किरकोळ मार लागला.त्यांना खोपोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
सदर बस ही बुलढाण्याहून रायगड अशी निघाली होती. अपघाताची खबर मिळताच खोपोली पोलीस, अपघात ग्रासतांच्या मदतीला सामाजिक संस्थेचे सदस्य तेथे पोहचले. व तात्काळ मदत केली.
या सर्व विद्यार्थ्याची सकाळी नास्ता ची सोय गगनगिरी आश्रमात करण्यात आली.